UTS APP CLOSED : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; १ मार्चपासून UTS APP कायमच बंद

मुंबई : रोजच्या धावपळीत लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. मोबाईलवरून तिकीट आणि मासिक पास काढण्यासाठी वापरले जाणारे Railway UTS App येत्या १ मार्चपासून बंद केले जाणार आहे.


रेल्वे प्रशासनाने डिजिटल सेवांमध्ये बदल करत हे अ‍ॅप टप्प्याटप्प्याने मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्याऐवजी आता सर्व सुविधा Rail One App या नवीन अ‍ॅपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहेत.



कोणत्या सेवा थांबल्या?


मासिक पास काढणे, नूतनीकरण, प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि डिजिटल पाकीट भरणा या सुविधा आधीच बंद करण्यात आल्या आहेत. याच सर्व सोयी प्रवाश्याना रेल वन या अ‍ॅपमध्ये मिळणार आहेत.



वैध पासधारकांनी काय करावे?


ज्यांचे पास १ मार्चनंतरही वैध आहेत, त्यांना रेल वन या अ‍ॅपमध्ये नवीन अ‍ॅपमध्ये ट्रान्सफर सुविधा उपलब्ध आहे. नवीन अ‍ॅप डाउनलोड करून नोंदणी पूर्ण केल्यानंतर पास सहजपणे वापरता येणार आहे.



बदल का महत्त्वाचा?


डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि एकत्रित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, मात्र भविष्यातील सोयीसाठी हा बदल आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाचे सांगितले आहे.


Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल