Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर गेले आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी ३ एप्रिलला होणार होता, मात्र आता तो सोमवारी ६ एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा टप्पा आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा टप्पा मागील तीन ते चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.


या दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून संचालनासाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. तरीही लोकार्पण रखडल्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही मुंबईकरांना मेट्रो सेवेचा लाभ घेता येत नव्हता. या दोन मेट्रो टप्प्यांच्या लोकार्पणासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामालाही सुरुवात होणार होती. त्यासाठी राज्य सरकारने ३ एप्रिलची तारीख निश्चित केली होती आणि त्यानुसार एमएमआरडीएने (एमएमआरडीए) तयारीही सुरू केली होती. मात्र, सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच बुधवारी उशीरा रात्री राज्य सरकारने शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे सर्व कार्यक्रम सोमवार (६ एप्रिल) रोजी होणार असून त्यानंतर मंगळवार (७ एप्रिल) पासून या दोन मेट्रो मार्गिकांवर नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मेट्रोसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, कार्यक्रम पुढे ढकलण्यामागचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे काही नेते व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा