मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील रेल्वे उड्डाणपुलाचे 'आरओबी'चे पॅनेल्स काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप धीम्या मार्गावर आणि अप व डाऊन जलद मार्गांवर दोन आणि तीन एप्रिल दरम्यानच्या मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांनी ब्लॉक सुरू होईल आणि शुक्रवार ३ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.


ब्लॉक काळात ११०२० भुवनेश्वर न्यू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेसचा मार्ग माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान वळवण्यात येईल आणि तिला दादर स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल. तसेच ११०२० भुवनेश्वर न्यू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, १२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल आणि १२१३४ मंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान वळवण्यात येईल आणि त्यांना दादर स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल.


पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षितता यासाठी आवश्यक असल्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या