मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, उपसचिव चेतन निकम तसेच राज्यभरातील परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


“परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात काही परदेशी नागरिकांनी रहिवासी दाखले मिळवून रिक्षा व टॅक्सी परवाने प्राप्त केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मागील काही वर्षांत दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्याचे निर्देश देत या मोहिमेची सुरुवात मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातून करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


मीरा-भाईंदर परिसरात विशेष मोहीम राबवून सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येईल यासाठी महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्याचेही आदेश देण्यात आले असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरा; पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदे रिक्त https://prahaar.in/2026/08/24/why-are-jihadis-who-throw-eggs-at-the-ganesh-procession-even-needed-in-maharashtra-minister-nitesh-rane-asks-angrily/ मुंबई : मुंबई महापालिका

Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.