सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पाच महागनरपालिका आयुक्त आणि चार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


गुरूवारी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या जागी डाॅ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, किरण पाटील हे नवे पशुसंवर्धन आयुक्त असतील. तर, दीपक सिंगला यांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर आयुक्तपदी करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांची जल जीवन मिशन, नवी मुंबईचे मिशन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप स्वामी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


तर, प्रजीत नायर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अंकित यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे मध्ये अतिरिक्त आयुक्तपदी तर, वर्षा ठाकूर-घुगे यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबईच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


महापालिका आणि आयुक्त




  1. छत्रपती संभाजीनगर - अमोल येडगे

  2. जालना - अंजली शर्मा

  3. अमरावती - वर्षा लढ्ढा

  4. कोल्हापूर - डॉ. राजेंद्र भारूड

  5. सांगली मिरज कुपवाड शहर - संजीता मोहपात्रा


जिल्हा आणि जिल्हाधिकारी




  1. बुलडाणा - डॉ. प्रवीणकुमार देवरे

  2. लातूर - डॉ. भारत बास्टेवाड

  3. कोल्हापूर - डॉ. विजय राठोड

  4. गोंदिया - डॉ. मंगेश गोंदावले

  5. चंद्रपूर - वसुमना पंत

  6. सोलापूर - कार्तीकेयन एस.

  7. नागपूर - कुमार आर्शिवाद


जिल्हा परिषद - मुख्य कार्यकारी अधिकारी




  1. छत्रपती संभाजीनगर - मिन्नू पी. एम.

  2. जालना - कृष्णकांत कनवारिया

  3. अमरावती - सत्यम गांधी

  4. कोल्हापूर - डॉ. जॅसमिन

Comments
Add Comment

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६