युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

गांधीनगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गांधीनगर ( गुजरात) येथे करण्यात येणार आहे. हा पुतळा गांधीनगरमधील समस्त महाराष्ट्र समाज मंडळाच्या वतीने उभारण्यात आला आहे.


केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तसेच गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश पंचाळ आदींची उपस्थिती असेल. यावेळी पुण्यातील लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवप्रताप महानाटक हे नाटक सादर करेल.


महाराष्ट्र समाज मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला सदर पुतळा एकूण २० फूट उंचीचा असून पुतळ्याचे वजन ८५० किलो आहे. पुतळ्याचा चौथारा ८ फुटाचा असून ७ फुटाचा घोडा तर पाच फुटांची शिवरायांची प्रतिकृती आहे. या पुतळ्यासाठी संपूर्ण फायबर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, कलोल, दोड्डासह गुजरातमधील समस्त मराठी जन उपस्थित राहणार आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामागे स्वराज्य, पराक्रम, राष्ट्रप्रेम आणि न्यायाचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याची, तसेच भावी पिढीला प्रेरणा मिळावी अशी आमची भावना आहे. हा पुतळा शिवरायांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि मराठी अस्मितेची आठवण करून देणारे एक सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रतीक म्हणून स्थापित करत आहोतच परंतु हा पुतळा अन्यायाविरुद्ध लढण्याची, प्रगत विचारांची आणि स्वदेशाभिमानाची ऊर्जा देणारा ठरेल. महाराजांचे कार्य, वीरता आणि शौर्य यांची भावी पिढीला जाणीव व्हावी, आणि त्यातून देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. शिवाजी महाराजांचा हा केवळ पुतळा नसून, तो एका महान नेतृत्वाच्या विचारांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून तो आम्ही गांधीनगर मध्ये उभा करीत आहोत असे गांधीनगर मराठी समाज मंडळाचे विश्वस्त दत्ताजी पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Wardha Train Fire: देशात आगीच्या घटना सुरूच; वर्धा GT एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, मोठा अनर्थ टळला

देशात गेल्या दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने घडतांना दिसत आहेत. आज (मंगळवार १७ फेब्रुवारी) वर्धा - तुळजापूर

Weather Update: १७, १८ आणि १९ तारखेला १० राज्यात पावसाची शक्यता; 'या' राज्यांना हवामान विभागाचा इशारा

दिल्ली: देशातील बहुतेक भागात हवामान झपाट्याने बदलत आहे. फेब्रुवारीमध्ये अनेक राज्यांमध्ये मार्चसारखी उष्णता

Emmanuel Macron India Visit: इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर; मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

दिल्ली: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला

Ameesha Patel : आता अमिशा पटेल ११ लाखांसाठी खाणार जेलची हवा? अजामीनपत्र वॉरंट जारी, प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कायदेशीर कारवाईचे सत्र सुरू असून, अभिनेता राजपाल यादव नंतर आता अभिनेत्री अमिषा पटेल

PM Narendra Modi: राजस्थानातील आगीत ८ जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली: राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका

Bengaluru News : आनंदाच्या क्षणांवर विरजण! आईच्या मॅटर्निटी फोटोशूट दरम्यान ३ वर्षांच्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू

बंगळुरू : आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी आणि त्या आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आईचं 'मॅटर्निटी