म्हाडाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी

मुंबई: मुंबई महापालिकेने आता मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम हाती घेत मोठ्या थकबाकीदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात कराची रक्कम थकीत असलेल्या ४० थकबाकीदारांची नावे जाहीर केल्यानंतर तब्बल २७० कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या आणखी २० मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये म्हाडा प्राधिकरणासह मोठ्या विकासकांचाही समावेश आहे. वांद्र्यातील म्हाडा कार्यालयाची तब्बल ६३ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याचे दिसून आले.


मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.


तरीही, काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी केले आहे.




‘टॉप २०’ मालमत्ताधारकांची यादी-



-महाराष्‍ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (एच पश्चिम विभाग) - ६३ कोटी २१ लाख ४० हजार ५९१ रुपये


-मेसर्स राजहंस असोसिएट्स (एस विभाग) - ४६ कोटी ०५ लाख २७ हजार ०६५ रुपये


-मेसर्स विमल असोसिएट्स (के पूर्व विभाग) - ३९ कोटी ०९ लाख ८५ हजार ०८५ रुपये


-नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - १० कोटी ३६ लाख ८१ हजार ०४८ रुपये


-नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - १० कोटी २० लाख ७८ हजार ५८९ रुपये


-यशवंत एन. जाधव एसएसव्‍ही रिऍल्‍टर्स (एन विभाग) - ९ कोटी ९४ लाख ७० हजार १४५ रुपये


-अंबिका सिल्‍क मिल (जी दक्षिण विभाग) - ९ कोटी ६४ लाख ९० हजार ९८२ रुपये


-महाराष्‍ट्र शासन भोगवटादार सुशीलकुमार संभाजी शिंदे प्रतिष्‍ठान (एच पूर्व विभाग) - ८ कोटी ७९ लाख २९ हजार ९४८ रुपये


-द व्हिक्‍टोरिया मिल्‍स् लिमिटेड, प्‍लाझा पंचशील मिल (डी विभाग) - ८ कोटी ७६ लाख ६८ हजार ००६ रुपये


नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - ८ कोटी ०८ लाख ७० हजार ३२८ रुपये


मोहम्‍मद युसूफ खान (एल विभाग) - ७ कोटी ६४ लाख ८९ हजार ०३६ रुपये


-एएच वाडिया ट्रस्‍ट स्‍कायलिंक डेव्‍हलपर्स (एच पूर्व विभाग) - ७ कोटी ५६ लाख ७८ हजार २७२ रुपये


-मेहरून्‍निसा मोहम्‍मद साहेब खतीब (बी विभाग) - ७ कोटी ३३ लाख ८० हजार ७११ रुपये


-द न्‍यू सन मील कॉम लिमिटेड शुभम् फॅब्रीक (जी दक्षिण विभाग) - ७ कोटी १९ लाख ३० हजार ०४७ रुपये


-जय माता दि कन्‍स्‍ट्रक्‍शन (एम पश्चिम विभाग) - ५ कोटी ७९ लाख ३५ हजार ५६३ रुपये


-ट्रान्‍सकॉन ट्रायम्‍फ फेज २ प्रायव्‍हेट लिमिटेड (के पश्चिम विभाग) - ५ कोटी ७८ लाख १० हजार ५५२ रुपये


-ट्रान्‍सकॉन ट्रायम्‍फ फेज २ प्रायव्‍हेट लिमिटेड (के पश्चिम विभाग) - ५ कोटी ५६ लाख ५५ हजार ८९७ रुपये


-नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (एस विभाग) - ५ कोटी ३५ लाख १८ हजार १३८ रुपये


-एल्‍को आर्केड सहकारी गृहनिर्माण संस्‍था डी विंग (एच पश्चिम विभाग) - ४ कोटी ८१ लाख १२ हजार ०४६ रुपये


-गोल्‍डन रॉयल टॉकीज् (डी विभाग) - ४ कोटी २२ लाख ६७ हजार ४१५ रुपये

Comments
Add Comment

Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात

उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती

Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल

मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर

Mahashivratri Wishes : संयम आणि शक्तीचा सुरेख संगम म्हणजे महाशिवरात्र, महाशिवरात्रीनिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महाशिवरात्र आपल्याला संयम, ध्यान आणि आंतरिक शांततेचे महत्त्व समजावून सांगते.

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला भर रस्त्यात लागली आग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन

सोमवारी महापालिका सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई: मुंबईचे महापौरआणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी