मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रीमियम आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या वाढत्या मागणीमुळे एमएमआर हे देशातील सर्वात यशस्वी निवासी बाजार ठरले आहे, असे क्रेडाई–लायसेस फोरास यांच्या वार्षिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालानुसार, केवळ ग्रेटर मुंबईने १,३३,००५ कोटी रुपयांची निवासी विक्री मूल्य नोंदवून देशाला थक्क केले आहे. यामध्ये विशेषतः २ कोटी ते ५ कोटी रुपयांच्या उच्च-मूल्य श्रेणीतील घरांना सर्वाधिक पसंती मिळाली असून, मुंबईत प्रीमियम हाऊसिंगची लाट असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.


पुरवठा ट्रेंड्सकडे पाहता, १ कोटी रुपये ते ५ कोटी रुपये किमतीतील २बीएचके घरांना मोठी मागणी असून, १बीएचके युनिट्सची मागणी मुख्यतः ५० लाख रुपये ते २ कोटी रुपये या श्रेणीत केंद्रित असल्याचे दिसून येते. सध्या ग्रेटर मुंबईत २,६६३ प्रकल्पांचे काम सुरू असून, सुमारे २० महिन्यांचा 'इन्व्हेंटरी' (शिल्लक घरे) उपलब्ध आहे, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात उत्तम संतुलन दिसून येत आहे. सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांमुळे ठाणे आणि नवी मुंबईत घरांच्या किमतीत ४.५% वाढ नोंदवण्यात आली आहे. उच्च-मध्यम आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये ठाणे आघाडीवर आहे. तर मध्यम-आय आणि नवीन प्रीमियम प्रकल्पांसाठी नवी मुंबई हे ग्राहकांचे आवडीचे केंद्र बनले आहे. २०२५ मध्ये एमएमआरमध्ये घरांच्या किमतीत होणारी वाढ स्थिर राहिली आहे.


कल्याण-डोंबिवली हा भागही उपनगरीय हब म्हणून वेगाने विकसित होत असून, २०२५ मध्ये येथे एचपीआय ३.०% पर्यंत पोहोचला. परवडणाऱ्या किमती आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे या भागात ₹७५ लाखांपर्यंतच्या घरांना विशेष मागणी आहे. याशिवाय, वसई–विरार आणि मीरा-भायंदरसारख्या परिघीय भागांतही स्थिर मागणी कायम आहे. २०२५ मध्ये या बाजारांत एचपीआय २.१% नोंदवला गेला असून, परवडणाऱ्या आणि मध्यम-आय गटातील घरांकडे खरेदीदारांचा कल दिसून येतो.


ग्रेटर मुंबईत हाऊसिंग प्राईस इंडेक्स ३.४% नोंदवण्यात आला, जो या क्षेत्राचा मजबूत आर्थिक पाया आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवतो.अहवालात नमूद केल्याप्रमाणे, एमएमआरमधील ही सातत्यपूर्ण वाढ प्रामुख्याने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे, सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे आणि मजबूत आर्थिक आधारामुळे शक्य झाली आहे. यामुळे प्रमुख मायक्रो-मार्केट्समध्ये एंड-यूजर्स आणि गुंतवणूकदारांची मागणी पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची