मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत मंडळामार्फत या आठवड्यात सुमारे २५०० घरांसाठी सोडतीची जाहिरात काढण्याची शक्यता आहे. या सोडतीत मुंबईतील विविध भागांतील घरे उपलब्ध होणार असून, अनेकजण या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लॉटरीमध्ये विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली आणि पंतनगर या भागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे सुमारे १२०० घरे उपलब्ध होणार आहेत, यामुळे या भागाकडे अधिक लक्ष लागले आहे.


यंदाच्या लॉटरीतील घरे थोडी महागडी ठरण्याची शक्यता आहे. घरांच्या किंमती अंदाजे ३२ लाख रुपयांपासून सुरू होऊन तब्बल ८ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहेत. पहाडी गोरेगावमधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काही घरे सुमारे ३२ लाख रुपयांत मिळणार आहेत, मात्र इतर बहुतांश घरे कोटींच्या घरात असल्याने सर्वसामान्यांसाठी ती परवडणारी नसल्याची चर्चा आहे. ३१ मार्च रोजी लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, कारण संगणकीय पद्धतीने पारदर्शक सोडत काढली जाते.


अर्ज करण्यासाठी काही अटीही ठरवण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. विवाहित असल्यास पती-पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे, तर अविवाहित व्यक्तींनी स्वतःची कागदपत्रे सादर करावी लागतील. याशिवाय अर्जदाराने महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य केल्याचा अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) असणे बंधनकारक आहे. या लॉटरीत मुख्यतः मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी जास्त घरे असणार आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीही व्यक्त होत आहे. तरीही, मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर मिळवण्याची ही एक मोठी संधी मानली जात आहे. यापूर्वी २०२४ मध्ये म्हाडाने सुमारे २००० घरांसाठी लॉटरी काढली होती, ज्यात घरांच्या किंमती २९ लाख ते ६.८२ कोटी रुपयांदरम्यान होत्या. २०२५ मध्ये लॉटरी न झाल्याने यंदाच्या सोडतीकडे विशेष लक्ष लागले आहे. मुंबईत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही लॉटरी महत्त्वाची ठरणार असून, इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास