पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. भारताने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या तिन्ही संघांविरूद्धचे साखळी सामने जिंकले. आता भारताचा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध साखळी सामना आहे. पण या सामन्याआधीच भारत सुपर एट फेरीसाठी पात्र झाला आहे.


प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग दुसरे अर्धशतक केले. याआधी ईशानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात ६१ धावांचे योगदान दिले होते.


पाकिस्तानची फलंदाजी


भारताने दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने शून्य, सईम अयुबने ६, सलमान आगाने ४, बाबर आझमने ५, उस्मान खानने ४४, शादाब खानने १४, मोहम्मद नवाजने ४, फहीम अशरफने १०, शाहीन आफ्रिदीने नाबाद २३, अबरार अहमदने शून्य आणि उस्मान तारिकने शून्य धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर कुलदीप यादव आणि तिलक वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.


भारताची फलंदाजी


पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे भारतच प्रथम फलंदाजीसाठी आला. भारताकडून ईशान किशनने सर्वाधिक ७७, अभिषेक शर्माने शून्य, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने ३२, हार्दिक पंड्याने शून्य, शिवम दुबेने (धावबाद) २७, रिंकू सिंगने नाबाद ११, अक्षर पटेलने नाबाद शून्य धावा केल्या. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन तर सलमान आगा, उस्मान तारिक आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


'ई'शान शो!


ईशान किशनने फलंदाजीतील शानदार शो दाखवून दिला. त्याने दबावात तुफान फटकेबाचीचा नजराणा पेश करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. ईशान किशनचे या टी ट्वेंटी विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक होते. त्याची ही खेळी भारतासाठी मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी आहे. या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरे जलद अर्धशतक पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावरही ईशान किशन याने आपल्या नैसर्गिक धाटणीत तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तो शतकी खेळीसह मोठा धमाका करेल, असे चित्र निर्माण झाले असताना भारताच्या डावातील ९ व्या षटकात सईम अयूबच्या चौथ्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ८८ धावांवर भारताने ही विकेट गमावली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या.


ईशान किशन टी वर्ल्डकप २०२६ मधील कामगिरी




  • ७ फेब्रुवारी विरुद्ध अमेरिका - २० धावा

  • १२ फेब्रुवारी विरुद्ध नामिबिया - ६१ धावा

  • १५ फेब्रुवारी विरुद्ध पाकिस्तान - ७७ धावा

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला