Saturday, February 14, 2026

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने सुरु व्हायचा. उबाठाच्या काळातील हा इतिहास आता महायुती पुसून टाकणार असून यापुढे महापालिकेचे सभागृह नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे गटनेते घड्याळाच्या काट्यावर सुरु करून सदस्यांना जास्तीत सभागृहात बोलण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहाची लया मागील काही वर्षांपासून तत्कालिन सत्ताधारी उबाठाच्या महापौरांनी घालवली असून प्रत्यक्षात पहिल्या निश्चित केलेल्या सभेचे कामकाजही वेळेत सुरु करण्यात येत नव्हती. दुपारी अडीच वाजता सुरु होणारे सभागृह हे प्रत्यक्षात नगरसेवक सभागृहात उपस्थित असूनही महापौर हे सभागृहात उशिराने येत असत. त्यामुळे सभागृह तब्बल दीड ते तास उशिराने सुुरु होण्याची प्रथा मागील काही वर्षांमध्ये उबाठाच्या महापौरांनी घातली होती. तसेच सभागृहामध्ये विविध विषयांवर सदस्यांना चर्चा करू न देता त्यांचा बोलण्याचा हक्कही हिरावून घेतला जात होता. त्यामुळे बहुतांशी नगरसेवकांना मागील नगरसेवक काळात संसदीय कार्यप्रणाली समजून घेता आलेली नाही तसेच आपले प्रश्न आणि समस्याही मांडता आल्या नाहीत.

मात्र, उबाठाची सत्ता जावून आता भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता महापालिकेत आल्यानंतर त्यांनी यापूर्वीचा इतिहास आता पुसून नव्याने इतिहास लिहिणार आहेत. यामध्ये सभागृह भरण्याची वेळ दुपारी दोन वाजता देवून प्रत्यक्षात ठिक अडीच वाजता सभागृह सुरु केले जाईल अशाप्रकारची रणनिती आखली आहे.भाजपचे गटनेते आणि भावी सभागृहनेते गणेश खणकर आणि शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी यापुढे ठिक अडीच वाजताच सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करून प्रत्येक विषयांवर साधक बाधक चर्चा करून यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांना भाग घेता येईल अशाप्रकारे सभागृह चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. त्यामुळे ज्या उबाठाच्या यापूर्वीच्या महापौरांनी सभागृहात चर्चा न करता कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला होता, तिथे आता महायुतीने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याची पूर्ण संधी देणार आहेत,तसेच वेळेत सभागृहाचे कामकाज सुरु करून वेळेत संपवून लांबच्या नगरसेवकांना गर्दीविना घरी जाण्यास देणार आहे.

महापालिकेतील पहिली निश्चित केलेली सभा ही महत्वाची असून ती कोणत्याही कारणांशिवाय घ्यावी लागते. त्यानंतर दुसऱ्या सभेमध्ये ठरावाच्या सूचनांसह इतर कामकाज तसेच त्यानंतर तहकूब सभा अशाप्रकारे पाच ते आठ सभा किंवा त्यापेक्षा अधिकही घेता येवू शकतात. पण उबाठाच्या काळात तीनच्या वरही सभा घेण्यात आली नव्हती, त्यातुलनेत अधिक सभा घेण्याचा महायुतीच्या गटनेत्यांनी विचार प्रकट केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >