Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या लोकलमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात बुरखा परिधान केलेला एक संशयित पुरुष चढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. महिला प्रवाशांना त्या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली आणि या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. आपण पकडले जाणार हे लक्षात येताच, घाटकोपर स्थानक जवळ येत असताना त्या संशयिताने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. इतक्यावरच न थांबता, त्याने रेल्वे रूळ ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या 'कर्जत फास्ट' लोकलमध्ये चढून पळ काढला. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महिला प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





चक्क चालत्या गाडीतून पसार 


एका संशयित व्यक्तीने बुरखा परिधान करून महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात प्रवेश केला. इतकेच नाही तर, बुरख्याचा आधार घेत त्याने डब्यातील महिला प्रवाशांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा (विनयभंग) प्रयत्न केल्याने डब्यात खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने डब्यातील महिलांनी प्रसंगावधान राखत त्याला घेरले आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. आपण अडकल्याचे लक्षात येताच, ट्रेन घाटकोपर स्थानकात पोहोचण्यापूर्वीच त्या संशयिताने चालत्या गाडीतून धोकादायक उडी मारली. ट्रेनमधून उडी मारल्यानंतर या व्यक्तीने रेल्वे रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या कर्जत जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये प्रवेश केला आणि तेथून पळ काढला. या घटनेमुळे रेल्वे पोलीस आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महिला प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस सध्या व्हिडिओच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.



RPF कडून संयुक्त तपास सुरू


लोकलमधील महिला डब्यात बुरखा घालून घुसलेल्या संशयित आरोपीला पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आता आपली यंत्रणा अधिक तीव्र केली आहे. घाटकोपर RPF ने याप्रकरणी कलम १६२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी GRP आणि RPF ची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. महिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलुंड आणि ठाणे स्थानकांत तपासणी केली, मात्र आरोपी निसटण्यात यशस्वी झाला. कुर्ला GRP चे वरिष्ठ अधिकारी संभाजी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात अंबिवली स्थानकावर अशाच प्रकारे बुरखा घालून आलेल्या एका व्यक्तीने चैन स्नॅचिंग केली होती. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहता, ही व्यक्ती एकच असावी असा दाट संशय पोलिसांना आहे. कल्याण GRP कडे असलेल्या जुन्या गुन्ह्याच्या माहितीच्या आधारे या संशयिताचा तांत्रिक तपास सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला जात आहे.


Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल