मेट्रो- ४ मार्गिकेच्या कामाला गती

भांडुप येथे ३२५ मेट्रिक टनचे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित


मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या मार्गिकेच्या कामाअंतर्गत भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रीक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आले आहेत. या कामामुळे मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला आता गती येणार आहे.


मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले. ८ हेवी ड्युटी क्रेन्स आणि १२ मल्टी-अॅक्सल वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. या कामासाठी महानगरपालिका (बीएमसी), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदार यांच्यासोबत एमएमआरडीएने उत्कृष्ट समन्वय साधला. उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.

या कामासाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वाॅर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. योग्य नियोजनामुळे भव्य असे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित करण्याचे आव्हान या पथकामुळे पेलता आले. या कामाच्या अनुषंगाने आता मेट्रो ४ मार्गिकेतील कामाला गती मिळणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन पहिल्या टप्प्यानंतर पुढील टप्पे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :