सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण करणारे घटक, विविध आस्थापना, कचराविषयक सेवा प्रदाता, घनकचरा व्यवस्थापन, साठवणूक, वितरण व प्रक्रिया, या बाबत नियमावलींचा समावेश आहे. नागरिक किंवा आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५०, कचरा टाकल्यास ५००, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २०० रूपये, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास थेट २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, हा उपविधी जारी करण्यात येत आहे. मुंबईत घनकचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अविरतपणे प्रयत्न केले जात आहेत असं अश्विनी जोशी यांनी सांगितले.


नागरी घनकचऱ्याची साठवणूक आणि वितरण, उत्पादक, महानगरपालिका प्रशासन, प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांची जबाबदारी व कर्तव्ये, वस्तू पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ), घनकचरा, जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, बांधकाम व पाडकाम राडारोडा, प्लास्टिक कचरा आदींसंदर्भात सविस्तर नियमावलीचा समावेश आहे. विविध आस्थापना, नागरिक तसेच संबंधित सर्वांनी मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. आपले घर, परिसर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. उपविधीतील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील डॉ. अश्विनी जोशी यांनी केले.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :