गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि ठोस पाऊले उचलली आहेत. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असून, सन २०२९ पर्यंत तब्बल २३८ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवेत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर १५ डब्यांच्या लोकल ट्रेन येत्या जून महिन्यापासून धावण्याची शक्यता आहे.


मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, दररोज वाढणारी प्रवासी संख्या, अपघात आणि असुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने रेल्वे पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.



जूनपर्यंत १५ डब्यांच्या लोकल रुळांवर


प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि क्षमतेत वाढ करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेले फलाट वाढवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवर फलाटांचे विस्तारीकरण केले जात असून, जून महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.



मार्चपासून सेफ्टी डोअर लोकलची चाचणी


प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत, दोन सेफ्टी डोअर असलेल्या लोकल ट्रेन मार्च महिन्यापर्यंत ट्रायल बेसिसवर सुरू केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखण्यास मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.



२०२९ पर्यंत २३८ एसी लोकल


मुंबईकरांच्या प्रवासाला गारवा देण्यासाठी २०२९ पर्यंत २३८ एसी लोकल ट्रेन सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गर्दीच्या वेळेतही प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पूर्व आणि पश्चिम रेल्वे मार्गांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विशेष कॉरिडॉर विकसित केला जाणार असून, मालवाहतुकीलाही चालना मिळणार आहे

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा