भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणी


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर येत्या सोमवारी भाजप नगरसेवकांची नोंदणी विभागीय कोकण आयुक्तांकडे केली जाणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील गटनोंदणीची चर्चा असतानाच सोमवारी भाजपच्यावतीने स्वतंत्र नोंदणीची प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचवेळी शिवसेना एकत्र नोंदणी करते की स्वतंत्रपणे नोंदणी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. आतापर्यंत काँग्रेस, एमआयएम, मनसे तसेच उबाठाच्या नगरसेवकांची नोंदणी कोकण भवनमध्ये झाल्यानंतर पुढील नोंदणीची औपचारिकता महापालिका सचिव विभागातही पार पडली आहे; परंतु भाजप आणि शिवसेनेची कोकण भवनमधील नोंदणी अद्याप झालेली नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे ही नोंदणी लांबणीवर पडली होती.


भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची एकत्रपणे गटनोंदणीची चर्चा सुरु असतानाच सोमवारी केवळ भाजप नगरसेवकांचीच गटनोंदणी होणार आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक एकत्रपणे असतील किंवा नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आपल्या नगरसेवकांची नोंदणी आणि पक्षाची नोंदणी करत गटनेते पदाची निवड केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. आतापर्यंत समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाची नोंदणी झालेली असून एका नगरसेवकाची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवक हे महायुतीतील घटक पक्ष म्हणून स्वतंत्र न गट म्हणून न राहता शिवसेनेसोबत गट म्हणून नोंदणी करु शकतील, असेही बोलले जात आहे.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे