P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. व्ही. श्रीनिवासन आज (शुक्रवार, ३० जानेवरी) सकाळी आपल्या राहत्या घरी बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारदरम्यान त्यांचे निधन झाले.


व्ही. श्रीनिवासन यांच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.


पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन हे केंद्र सरकारमधील माजी कर्मचारी होते. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अर्थात CISF मधून उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. १९९१ मध्ये पी.टी. उषा आणि श्रीनिवासन यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर श्रीनिवासन यांनी कायमच पी. टी. उषा यांना त्यांच्या खेळात, तसंच राजकीय करिअरमध्येही मोलाची साथ दिली.
Comments
Add Comment

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही

Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न मुंबई :

Odisha Earthquake: ओडिशात भूकंपाचे धक्के, लोक घरातून बाहेर धावले; दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओडिशा: ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. रात्री सुमारे