प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. व्ही. श्रीनिवासन आज (शुक्रवार, ३० जानेवरी) सकाळी आपल्या राहत्या घरी बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारदरम्यान त्यांचे निधन झाले.
व्ही. श्रीनिवासन यांच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन हे केंद्र सरकारमधील माजी कर्मचारी होते. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अर्थात CISF मधून उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. १९९१ मध्ये पी.टी. उषा आणि श्रीनिवासन यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर श्रीनिवासन यांनी कायमच पी. टी. उषा यांना त्यांच्या खेळात, तसंच राजकीय करिअरमध्येही मोलाची साथ दिली.






