बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर राज्यसभेच्या निवडणुकीतही विरोधकांचा पराभव झाला आहे.


बिहारमधील रिक्त झालेल्या पाच राज्यसभेच्या जागांसाठी एनडीएने बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जेडीयू) प्रमुख नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, राष्ट्रीय लोक मोर्चाचे (आरएलएम) प्रमुख उपेंद्र कुशवाह (दोघेही सध्याचे राज्यसभा सदस्य) आणि भाजपचे शिवेश कुमार यांना उमेदवारी दिली होती. हे सर्वजण जिंकले आहेत.


बिहारमधील पाच जागांसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या २०२ आमदारांनी मतदान केले. महागठबंधनने एमआयएम आणि बसपला सोबत घेतले होते पण त्यांना एक जण जिंकून आणण्यासाठी ४१ मतांचे समीकरण जुळवणे जमले नाही. महागठबंधनच्या उमेदवाराला ३७ मते मिळाली. मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे सुरेंद्र कुशवाहा, मनोज विश्वास आणि मनोहर प्रसाद सिंग हे तीन आमदार आणि राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदचे (आरजेडी) फैसल रेहमान हे गैरहजर राहिले.


बिहार विधानसभेत २४३ आमदार आहेत. यापैकी २०२ एनडीएचे अर्थात राओलाचे तर ४१ विरोधकांचे आमदार आहेत. विरोधकांच्या ४१ जणांपैकी महागठबंधनचे ३५ आमदार आहेत उर्वरित आमदार इतर पक्षांचे आहेत. पण एमआयएम आणि बसपला सोबत घेऊनही विरोधकांना ४१ मतांचे समीकरण जुळवणे जमले नाही.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१