ऑस्करच्या रेड कार्पेटवर ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकने हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

मुंबई: ९८ व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) लॉस एंजेलिस इथल्या 'डॉल्बी थिएटर'मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. ऑस्करच्या रेड कार्पेटवर अनेक हॉलिवूड सिनेतारकांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मूळची बॉलिवूडची असलेली, पण सध्या हॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवलेल्या प्रियांकानंही सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. पण, या सोहळ्यात चर्चा रंगली आहे ती मात्र, भारताची अब्जाधीशांच्या लेकीची.


भारतीय बिझनेसमन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी १५ मार्च रोजी ९८व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अत्यंत दिमाखदार अंदाजात उतरली. पती आनंद पिरामल यांच्यासह या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून, ईशा अंबानीनं ऑस्करच्या रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला. न्यूयॉर्कमधील 'मेट गाला'सारख्या जागतिक स्तरावरील कार्यक्रमांमध्ये ती यापूर्वीही अनेकदा दिसून आली असली, तरी ऑस्करच्या मंचावरील तिची ही पहिलीच उपस्थिती आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं आणि फॅशन विश्वात चर्चेचा मुख्य विषय ठरलीय. ईशा अंबानीनं आपल्या अत्यंत मोहक लूकमुळे या संपूर्ण सोहळ्याची लाईमलाईट स्वतःकडे खेचून घेतली.





ऑस्करच्या रेड कार्पेटसाठी ईशा अंबानी यांनी फॅशन आणि परंपरा यांची अनोखी सांगड घातलेली पाहायला मिळते. त्यांनी व्हॅलेंटिनोच्या हॉट कॉउचर फॉल/विंटर २००६-२००७ कलेक्शनमधील विंटेज गाऊन वेअर केलेला. हा स्ट्रॅपलेस ब्लॅक आणि क्रीम गाऊन त्याच्यावरच्या फुलांच्या अत्यंत बारीक भरतकामामुळे खूपच आकर्षक दिसत होता. ईशा अंबानींनी आपला लूक आणखी खुलवण्यासाठी, लोरेन श्वार्ट्झनं डिझाइन केलेला डायमंड चोकर आणि त्यालाच मॅचिंग कानातले वेअर केलेले. रेड कार्पेटवर पाऊल ठेवण्यापूर्वी, त्यांनी अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सलाही भेट दिली, ही भेट नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आणि जागतिक सिनेमॅटिक संस्थांमधील परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी होती.



चाहत्यांकडून ईशाचं कौतुक


ईशा अंबानींच्या 'व्हिंटेज लूक'चं सर्वत्र कौतुक होत आहे. एका स्टायलिश गाउनमध्ये त्या अत्यंत मोहक दिसत होत्या. त्यांचं कौतुक करताना एका युजरनं लिहिलंय की, "ईशा अंबानी आपल्या लूकनं भल्याभल्या हॉलिवूड स्टार्सनाही टक्कर देत आहेत..., ती खरोखरच अतिशय सुंदर दिसतेय..." दरम्यान, दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय की, "या लूकसह ती संपूर्ण हॉलिवूडलाही मागे टाकतेय..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "ईशा अंबानी यांनी आपल्या अदांनी हॉलिवूडच्या सुंदरींनाही फिके पाडलेय..." या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाच्या वर्षाव होत आहे.




Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत