श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा


कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड यात्रेला माघ पौर्णिमेनिमित्त सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी सर्व यंत्रणांचा सखोल आढावा घेतला. यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित बैठकीत पोलीस, महसूल, महावितरण, आरोग्य आणि वाहतूक विभागासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी व वंशपरंपरागत ट्रस्टी उपस्थित होते.
संपूर्ण यात्रा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असेल. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वात मोठा फौजफाटा हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात करण्यात आला आहे. नेवाळी ते श्री मलंगगड मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत जादा बस सोडण्यात येणार आहेत.


वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि पाणीपुरवठा यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गडाच्या पायथ्याशी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


जया एकादशीच्या पहाटे वंशपरंपरागत पुजारी अॅड. विजय केतकर यांच्या निवासस्थानावरून पालखीचे प्रस्थान होईल. माघ पौर्णिमेच्या मुख्य दिवशी गडावर पालखी सोहळा पार पडणार असून, देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment

सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम

ठाणे : गर्डर काढण्याच्या कामामुळे येत्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात

धारण तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका सतर्क

तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती

ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी