बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, या अपघातातील वैमानिकांबाबत अत्यंत चकित करणारी माहिती समोर आली आहे. ज्या विमानाचा बारामतीमध्ये भीषण स्फोट झाला, त्याचे सारथ्य करणारे वैमानिक हे नवखे नसून अत्यंत अनुभवी होते. मात्र, नियतीच्या क्रूर खेळासमोर त्यांचा प्रदीर्घ अनुभवही अपुरा पडला. या दुर्दैवी प्रवासात विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्याकडे होती. यांना विमान चालवण्याचा प्रदीर्घ आणि मोठा अनुभव होता. अनेक आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी विमान हाताळले होते. शांभवी यांच्या नावावर तब्बल १५०० तासांच्या फ्लाईट सेवेचा दांडगा अनुभव होता. एवढे अनुभवी वैमानिक असतानाही, लँडिंगच्या वेळी विमानाने हवेत घेतलेल्या गिरट्या आणि त्यानंतर झालेला भीषण स्फोट, यामुळे तांत्रिक बिघाड किती गंभीर असावा, याचा अंदाज लावला जात आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी विमानाने हवेत काही गिरट्या घेतल्या. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे संतुलन बिघडले आणि ते थेट शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच झालेल्या मोठ्या स्फोटात अजित पवारांसह या दोन्ही अनुभवी वैमानिकांचा आणि इतर दोन सहकाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.
मुंबई : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ...
कोण होती शांभवी पाठक?
बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ज्या दोन वैमानिकांनी आपले प्राण गमावले, त्यापैकी एक म्हणजे सह-वैमानिक शांभवी पाठक. एका लष्करी अधिकाऱ्याची कन्या असलेल्या शांभवी यांनी अत्यंत कमी वयात विमान वाहतूक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. मात्र, नियतीने त्यांच्या यशाच्या उड्डाणाला मध्येच खिळ घातली. शांभवी पाठक यांचे शिक्षण आणि वैमानिक बनण्याचा प्रवास अत्यंत जिद्दीचा होता. २०१८-१९ मध्ये त्यांनी न्यूझीलंडच्या इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीतून आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी मुंबई विद्यापीठातून २०२० ते २०२२ या काळात एरोनॉटिक्स आणि एरोस्पेस सायन्समध्ये बी.एससी. पदवी संपादन केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी A-३२० या मोठ्या विमानाचे 'जेट ओरिएंटेशन ट्रेनिंग' देखील यशस्वीपणे पूर्ण केले होते. शांभवी या मार्च २०२२ पासून VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 'फर्स्ट ऑफिसर' म्हणून कार्यरत होत्या. स्पाईसजेटकडून त्यांना अधिकृत एव्हिएशन सेक्युरिटी परवानाही मिळाला होता. आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर त्यांनी आपल्या या व्यावसायिक प्रवासाच्या यशागाथा मांडल्या होत्या. १५०० तासांहून अधिक काळ हवेत उड्डाण करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. शांभवी यांचे वडील भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वडिलांकडून मिळालेली शिस्त आणि जिद्द यामुळेच त्यांनी एव्हिएशनसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. मुंबईत शिक्षण पूर्ण करून आकाशाला गवसणी घालण्याचे त्यांचे स्वप्न बारामतीच्या या भीषण अपघातात अधुरे राहिले.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात ...
शांभवीला १५०० तासांचा अनुभव
दरम्यान, शांभवी पाठक हिचा १५०० तासांचा अनुभव असून कॅप्टन सुमित कपूर यांचा विमानसेवेतील अनुभव १६००० तासांचा आहे. सुमित यांनी सहारा जे एअरवेज आणि जेट लाईट्स कंपनीसोबत काम केलेलं आहे.
अजित पवारांसमवेत विमानातील ५ जण
- अजित पवार - उपमुख्यमंत्री
- विदीप जाधव - अजित पवारांचे सुरक्षा रक्षक
- पिंकी माळी - क्रू मेंबर
- कॅप्टन सुमित कपूर - पायलट
- कॅप्टन शांभवी पाठक - पायलट