Ajit Pawar Passed Away : ओह शिट..! अजित पवारांचे विमान कोसळण्याआधी पायलटचे शेवटचे शब्द

मुंबई : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले, याबाबतची माहिती आता समोर येऊ लागली आहे. विमान कोसळण्याआधी वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी उच्चारलेले “ओह शिट… ओह शिट” हे शेवटचे शब्द या अपघाताची भीषणता अधोरेखित करणारे ठरत आहेत.


उपलब्ध माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्या हातात होती. सकाळच्या वेळेस धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे क्रमांक ११ वर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याने त्यांनी विमान पुन्हा वर घेतले. यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले, मात्र धावपट्टीला स्पर्श करण्याआधीच विमानाचा तोल गेला, ते उलटले आणि जमिनीवर जोरात आदळले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

- बारामती विमानतळाजवळील परिसरात वस्ती असल्याने अनेकांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान धावपट्टीपासून सुमारे १०० फूट आधीच कोसळले. विमान खाली उतरत असताना अपघात होणार, अशी भीती वाटत होती आणि तसेच घडले. धावपट्टीवर आदळताच विमानात मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. त्यानंतर सलग चार ते पाच स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
- अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. विमानातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही मदत करता आली नाही. काही गावकऱ्यांनी सांगितले की, स्फोटानंतर विमानाचे तुकडे उडून थेट घरांपर्यंत येऊन पडले.
- आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान आधी गावावरून गेले आणि नंतर खाली उतरताना दिसले. त्यानंतर ते धावपट्टीकडे गेले, उलटले आणि जमिनीवर आदळले. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आगीचे लोळ उठले होते.


विमानातील प्रवासी


१. उपमुख्यमंत्री अजित पवार
२. मुंबई पीएसओ हवालदार विदीप जाधव
३. पायलट कॅप्टन सुमित कपूर
४. कॅप्टन शांभवी पाठक
५. पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट



Comments
Add Comment

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार