अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना मूळ कर रकमेवर ५०% शास्ती मिळणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित करदारांनी नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधावा किंवा नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन थकबाकी रक्कम जमा करावी. या योजनेमुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होईल आणि कर वसुलीला प्रोत्साहन मिळून नगर परिषदेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी

कडोंमपात सेना-भाजपचे सूत्र ठरले!

शिवसेनेच्या नेत्याने सर्व संभ्रम दूर केले कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीत

'आनंद दिघेंचे स्वप्न पूर्ण करत आहोत, ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत राहील'

ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी

ठाण्यात १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात

विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा

कडोंमपातील ४ नगरसेवकांविरुद्ध उबाठाची हरवल्याची तक्रार

सखोल चौकशीची मागणी कल्याण : उबाठाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही ‘नॉट रिचेबल’ असल्याची

उल्हासनगरमध्ये नगरसेवकांचा मुक्काम रिसॉर्टमध्ये

फोडाफोडीचे राजकारण; भाजप-शिवसेनेचा बचावात्मक उपाय उल्हासनगर : महापौरपदासाठी उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि