मुंबईत रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री ३१ वर्षांच्या प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे.


ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओंकारने प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या केली. पोलिसांनी प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. सध्या आरोपीची बोरिवली पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.


हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. फक्त ट्रेनमधून उतरताना धक्का लागला म्हणून ओंकारने हत्या केली की या हत्येमागे वेगळे कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी आरोपी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.



कोण होते प्राध्यापक आलोक सिंह ?


नरसी मोनजी कॉलेज, विलेपार्ले येथे २०२४ पासून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. स्वभावाने शांत, दयाळू आणि सभ्य होते.वाद करणे, म्हणणे पटवून देण्यासाठी युक्तिवाद करत बसणे असा आलोक यांचा स्वभाव नव्हता. ते साधे होते आणि कोणावरही कधी संतापत नव्हते; अशी माहिती त्यांना ओळखणाऱ्यांनी दिली आहे.


आलोक सिंह शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री विलेपार्ले स्टेशनवरुन बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मालाड स्टेशनवर आलोक यांची हत्या झाली.


आलोक यांचे काकाही प्राध्यापक होते. जेमतेम दोन वर्षांपूर्वी आलोक यांचे लग्न झाले होते. पण शनिवारी घडलेल्या घटनेमुळे आलोक यांच्या नातलगांना जबर धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची

पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमातून साधला देशवासियांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार २५ जानेवारी २०२६

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा!

मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची