खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबतच त्या ठिकाणी शेतीपूरक उद्योग उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या जमिनीचा विनियोग कसा करावा, याबाबत 'मंत्रिमंडळ उपसमिती' सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. या प्रक्रियेत कोणताही घोटाळा होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.


आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आणि नानाभाऊ पटोले व विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या हरकतींवर उत्तर देताना महसूलमंत्री बोलत होते. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी स्वतंत्र कायदा करणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेला हा कायदा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला असता, त्यांनी यावर राष्ट्रपतींचे मत घेण्याचे निर्देश दिले आहेत. "संपादित केलेली जमीन पुन्हा मूळ मालकाला देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आडवे येत असल्याने हा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे,"


शेतकऱ्यांना जमीन की एमआयडीसीचा प्रकल्प?


सध्या सरकारसमोर दोन पर्याय असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन परत करण्यासाठी नवीन कायदा करून राष्ट्रपतींची मंजुरी मिळवणे आणि या जमिनीवर सौर ऊर्जा किंवा विमानाचे इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे. यामध्ये नेपिअर ग्रास (चारा) पासून हायड्रोजन निर्मिती करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला मोठा भाव मिळू शकतो.

विरोधकांच्या आरोपांना महसूलमंत्र्यांचे उत्तर


आमदार विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी ही जमीन खाजगी कंपन्यांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले की, "एमआयडीसीला ही जमीन देताना ती 'रेडी रेकनर'च्या चालू बाजारभावाने दिली जाईल. त्यामुळे शेती महामंडळाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच, जर हा प्रकल्प शेती महामंडळ स्वतःच्या स्तरावर तांत्रिकदृष्ट्या राबवू शकत असेल, तर त्या पर्यायाचाही विचार उपसमिती करेल."

Comments
Add Comment

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल

Nashik : रिंग रोडच्या मुद्द्यावर, निश्चितपणे मार्ग काढणार - मंत्री गिरीश महाजन

नाशिक : रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के

Nashik News : 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' पुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी

Girish Mahajan : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा - महाजन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा

Eknath Shinde : पंढरपूर कॉरिडॉरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; "शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही"

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, वारकरी

Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन, पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने अचानक ओढ दिल्याने निर्माण झालेली चिंतेची स्थिती आता