१ एप्रिलपासून जनगणना २०२७ चा पहिला टप्पा सुरू

नवी दिल्ली : देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून १ एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.


या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरांत जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील.


घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, विजेची व्यवस्था, सांडपाणी निचरा, शौचालयाची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी आहे का, याचीही नोंद केली जाणार आहे.


आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतो, हे देखील प्रगणक विचारतील.


जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

Comments
Add Comment

Chhattisgarh Bridge Stolen : छत्तीसगडमध्ये मध्य रात्री कॅनलवर बनलेला स्टीलचा पुल चोरीला, चोरांची अनोखी चोरी..!

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कोरबा शहरात एक विचीत्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथे हसदेव लेफ्ट कॅनालवर

जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी

राष्ट्रीय महामार्ग बंद, २० हून अधिक उड्डाणे रद्द श्रीनगर : जम्मू विभागातील उंच भागांमध्ये शुक्रवारी जोरदार

उष्णतेत वाढ, पावसात घट? एल निनोमुळे मान्सून धोक्यात

जूननंतर एल निनो सक्रिय होण्याची शक्यता नवी दिल्ली : देशात यंदाच्या मान्सूनबाबत चिंताजनक चिन्हे दिसून येत आहेत.

कर्नाटकात बाईक टॅक्सीला उच्च न्यायालयाकडून परवानगी

बंगळूरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी बाईक टॅक्सी चालविण्यास परवानगी दिली, तर बाईक टॅक्सी अॅग्रीगेटर्स,

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र