अश्रफ (शानू) पठाण गटनेते
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाने मोठी संघटनात्मक घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १२ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती दिली. या गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांना सादर केले.
नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत.
अश्रफ पठाण हे सलग तिसऱ्यांदा प्रभाग क्रमांक ३२ मधून निवडून आले असून, मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. त्यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे ठाणे महापालिकेतील सत्तासमीकरणांत नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.