१ दिवसात ६ लाख कोटी शेअर बाजारात खल्लास! 'सेल ऑफ'चा सर्वाधिक फटका अदानी शेअर्समध्ये! समुहाचे बाजार मूल्य १.१ लाख कोटीने कोसळले

मोहित सोमण: जागतिक स्तरावर अस्थिरतेचा फटका बसल्याने बाजार मूल्याप्रमाणे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी एका दिवसात पाण्यात गेले आहेत. एका दिवसात सेन्सेक्स ७६९.६७ व निफ्टी २४१.२५ अंकांनी कोसळल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. बाजारात सेल ऑफ व नफा बुकिंग होत असताना रूपयानेही आज ९१.९७ या निचांकी पातळीवर आपली घसरण नोंदवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक बाजारातून काढून घेतली. मोठ्या प्रमाणात इक्विटीत घसरण झाल्याने बाजारात तब्बल ६ लाख कोटीचे नुकसान झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कारण बीएसई (BSE) बाजारात कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४५२ लाख कोटींपर्यंत खाली आले.


दुसरीकडे बाजारातील तज्ञांनी सांगितले की, २०२५ मध्ये दिसलेला परदेशी विक्री आणि देशांतर्गत खरेदीचा पॅटर्न २०२६ मध्येही कायम आहे. दुसरीकडे नकारात्मक रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर वाढला होता. ज्यामुळे व्यापक बाजारात सेल ऑफ मुळे अदानी शेअर्समध्ये घसरण झाली. गौतम अदानी आणि सागर अदानी यांना थेट समन्स बजावण्यासाठी यूएस एसईसीने न्यायालयाची परवानगी मागितल्याच्या वृत्तानंतर अदानी ग्रीन, अदानी एंटरप्राइजेस, अदानी एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये एकत्रितपणे सुमारे ११% घसरण झाली. अदानी एंटरप्राईजेस (१०.७६%), अदानी एनर्जी (१०.७०%), अदानी ग्रीन एनर्जी (१३.८४%), अदानी पोर्ट अँड सेझ (६.९५%), अदानी टोटल गॅस (५.३६%), अंबुजा सिमेंट (४.९८%) समभागात घसरण झाली. त्यामुळे अखेरच्या सत्रादरम्यान समूहाचे एकत्रित बाजार मूल्य सुमारे १.१ लाख कोटी रुपयांनी घसरले आहेत.


एकूणच गुंतवणूकदारांनी केवळ जानेवारी महिन्यात प्रोविजनल आकडेवारीनुसार २५५० कोटींची रोख विक्री बाजारातून केली. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे डॉ. व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, जोपर्यंत कंपन्यांची कमाई लक्षणीयरीत्या सुधारत नाही किंवा केंद्रीय अर्थसंकल्पात बाजारासाठी अनुकूल मजबूत उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) खरेदीदार होण्याची शक्यता नाही.

Comments
Add Comment

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

Harbour AC local Update : हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल; 'या' तारखेपासून प्रवाशांना मिळणार ‘कूल’ प्रवासाचा अनुभव

नवी मुंबई : मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने २६ जानेवारीपासून हार्बर

Mega Block Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; येत्या रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी, २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वे, हार्बर

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यभार प्रधान सचिवांकडे

नगरविकास खात्याने केला नियमांत बदल मुंबई : महापौर पदाच्या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून मावळते महापौर किंवा