Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून काही ठिकाणी चाळीशीकडे झुकताना दिसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.



मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट :


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टी भागात ८ आणि ९ मार्च रोजी उष्ण व आर्द्र हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.



विदर्भात उष्णतेचा कहर :


विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमान सामान्यपेक्षा सुमारे पाच अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



पुण्यात सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी तापमान वाढलं :


पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.



मराठवाड्यातील तापमानातही लक्षणीय वाढ :


दरम्यान, मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर धाराशिवमध्ये ३६.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६ आणि उदगीर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई :

Mumbai Metro : मेट्रो मार्गिका ७ अ साठी अतिरिक्त उंचीच्या परवानगीची प्रतीक्षा; AAIकडून अंतिम अहवालाची MMRDAला अपेक्षा

मुंबई : मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पातील OHE (Overhead Equipment) यंत्रणेसाठी आवश्यक अतिरिक्त उंचीच्या परवानगीचा मुद्दा सध्या

Jalgaon : लेकाला वाचवण्यासाठी बाप धावून गेला, पण... पाण्यात बुडून बाप–लेकाचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथील

Festival Season Sugar Limit : सण-उत्सवांच्या काळात साखरेची झळ! स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसह डी-मार्टमध्ये साखर खरेदीवर निर्बंध

मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपारिक मिठाया

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय

Jalgaon : सौंदर्य प्रसाधने घेताना जरा जपूनच ! जळगावात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Jalgaon FDA Raid : जळगाव जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर