चारही पीठांचे शंकराचार्य १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार

दिल्लीत गोमाता रक्षणासाठी १० मार्चला कार्यक्रम


नवी दिल्ली: ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादाची व्याप्ती वाढत चालली आहे. १९ वर्षांनी चार पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार आहेत. १० मार्च २०१६ रोजी दिल्लीत गोमाता रक्षणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात गोमाता राष्ट्रमाता अभियानाच्या मंचातून चारही शंकराचार्य एकत्र येण्याची शक्यता आहे. अविमुक्तेश्वरानंद यांना याआधीच २ पीठांनी समर्थन दिले आहे. तिसऱ्या पीठाचे समर्थन मिळाल्यानंतर खरा-खोटा वाद मागे पडणार आहे. पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद, अविमुक्तेश्वरानंद नावावर उघड सहमती आतापर्यंत देत नव्हते परंतु २ दिवसांपूर्वी माघ मेळ्यात अविमुक्तेश्वरानंद यांना त्यांनी लाडके म्हटले होते. गोरक्षणासाठी पुरी पीठाचे शंकराचार्य आधीपासून आंदोलन करत आहेत. पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद यांनी गाईंच्या रक्षणाचे व्रत घेण्यासाठी आपले सिंहासन आणि छत्र त्यागले आहे. गोरक्षणाच्या विषयावर चारही शंकराचार्यांचे एकत्र येणे म्हणजे अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर सर्व शंकराचार्यांची मान्यता असून सर्व शंकराचार्यांना आमंत्रणे देण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी १९ मे २००७ रोजी, बंगळूरु येथे रामसेतू संदर्भात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये चारही पीठांच्या शंकराचार्यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती. शृंगेरी येथे पहिले चतुष्पीठ परिषद १७७९ आयोजित करण्यात आली होती.

भूतकाळात गोरक्षणाशी संबंधित अनेक आंदोलने : जर दिल्लीतील हा कार्यक्रम यशस्वी झाला, तर धार्मिक इतिहासात ही तिसरी वेळ असेल जिथं चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर एकत्र दिसतील. हा सनातन परंपरेसाठी ऐतिहासिक क्षण असेल. भूतकाळात गोरक्षणाशी संबंधित अनेक आंदोलने झाली आहेत व स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी या मुद्द्यावर अनेकदा उघडपणे बोलले आहेत.
Comments
Add Comment

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात

राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी

ओडिशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट बंद

ओडिशा राज्याचा निर्णय नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ओडिशा सरकारने गुरुवारी राज्यात बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, खैनी

जागतिक अर्थव्यवस्थेची माहितीही महत्वाची

विरोधकांच्या टीके फडणवीस यांचे उत्तरला नवी दिल्ली : जगातील राजकीय नेते इथे आहे. जगातील उद्योगांचे नेतृत्व