उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर : एकेकाळी सिंधी भाषिकांचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये यंदा महापालिका निवडणुकीत मराठी नगरसेवकांनी ५० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. एकूण ७८ जागांपैकी ३९ जागांवर मराठी नगरसेवक निवडून आल्याने, आता मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे. फाळणीच्या काळात विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याणलगतच्या ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत व खुल्या जागांवर वसवण्यात आले. उल्हास नदीमुळे शहराला ‘उल्हासनगर’ हे नाव मिळाले. आजही येथे सिंधी समाजाचा प्रभाव दिसून येतो. अनेक सिंधी कुटुंबे ठाणे, कल्याण, अंबरनाथ आदी शहरांकडे स्थलांतरित होत असताना मराठी व उत्तर भारतीय समाजाची संख्या वाढली आहे.


महापालिका निवडणुकीत ७८ पैकी ३९ म्हणजे ५० टक्के मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. सिंधी समाजाचे २९ (३७ टक्के) नगरसेवक असून, शीख तसेच उत्तर भारतीय–बंगाली समाजाचे प्रत्येकी ५ नगरसेवक आहेत. शिवसेना (शिंदे गट) व ओमी टीमने एकूण ३६ जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी २२ मराठी, ८ सिंधी, ४ शीख आणि उर्वरित उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत.
भाजपच्या ३७ नगरसेवकांपैकी २० सिंधी समाजाचे, १३ मराठी, १ शीख आणि ३ उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत. तर अन्य ५ जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे २, काँग्रेसचा १ आणि अपक्ष १ असे चार नगरसेवक मराठी समाजाचे असून, साई पक्षाचा १ नगरसेवक सिंधी समाजाचा आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात भाजपच्या प्रतिभा मढवी २८ नगरसेवकांमधून अव्वल

७१.५६ टक्के विक्रमी मतदानासह विजयी ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ३९ पैकी २८ जागा जिंकत सुमारे ७५

मीरा-भाईंदर महापालिका सभागृहात ४२ नवीन चेहरे; महिलांचे वर्चस्व

भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या नव्या सभागृहात यावेळी तब्बल ४२ नवीन चेहरे दिसणार असून, त्यामध्ये भाजपाचे

नवी मुंबई महापालिकेत शिवसेना विरोधी बाकावर बसणार

नवीन आणि तरुण चेहऱ्याची चर्चा नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) सत्ता मिळाली

अंबरनाथमधील सत्तासंघर्ष न्यायालयात

नगर परिषद सभा तहकुबीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष अंबरनाथ : राज्यात नुकत्याच

नवी मुंबईत तिरूपती देवस्थानाला ३.६ एकर भूखंड एक रुपयात

नवी मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत

ठाणे जिल्ह्यात शेतमाल निर्यातीसाठी मोठा प्रकल्प; भिवंडीत उभारणार अत्याधुनिक कृषी केंद्र

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि निर्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील