ठाण्यात भाजपच्या प्रतिभा मढवी २८ नगरसेवकांमधून अव्वल

७१.५६ टक्के विक्रमी मतदानासह विजयी


ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ३९ पैकी २८ जागा जिंकत सुमारे ७५ टक्के स्ट्राईक रेट राखला आहे. या २८ विजयी नगरसेवकांमध्ये नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी या उमेदवार ७१.५६ टक्के मतांसह भाजपमधील सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरल्या आहेत.


नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मध्ये एकूण २५ हजार ७७ मतांपैकी प्रतिभा मढवी यांना तब्बल १७ हजार ९४५ मते मिळाली. डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या सामाजिक कार्याची ही मतदारांकडून मिळालेली पोहोचपावती असल्याचे मानले जात आहे.


ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीत असलेल्या भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या; यंदा त्यात ५ जागांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, निवडणूक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ओवळा ते शिळपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघांत मजबूत कामगिरी केली. दरम्यान, भाजप–शिवसेना महायुतीतून ठाण्यात लढलेल्या एकूण १३१ जागांपैकी सात उमेदवारांना ७० टक्क्यांहून अधिक मतदान मिळाले आहे. यामध्ये शिवसेनेचे योगेश जानकर (७६.४६ टक्के) अव्वल ठरले असून, त्यापाठोपाठ डॉ. दर्शना जानकर (७२.३३ टक्के) आणि भाजपच्या प्रतिभा मढवी (७१.५६ टक्के) यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर : एकेकाळी सिंधी भाषिकांचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये यंदा महापालिका निवडणुकीत मराठी

मीरा-भाईंदर महापालिका सभागृहात ४२ नवीन चेहरे; महिलांचे वर्चस्व

भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या नव्या सभागृहात यावेळी तब्बल ४२ नवीन चेहरे दिसणार असून, त्यामध्ये भाजपाचे

नवी मुंबई महापालिकेत शिवसेना विरोधी बाकावर बसणार

नवीन आणि तरुण चेहऱ्याची चर्चा नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) सत्ता मिळाली

अंबरनाथमधील सत्तासंघर्ष न्यायालयात

नगर परिषद सभा तहकुबीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजच्या सुनावणीकडे लक्ष अंबरनाथ : राज्यात नुकत्याच

नवी मुंबईत तिरूपती देवस्थानाला ३.६ एकर भूखंड एक रुपयात

नवी मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत

ठाणे जिल्ह्यात शेतमाल निर्यातीसाठी मोठा प्रकल्प; भिवंडीत उभारणार अत्याधुनिक कृषी केंद्र

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि निर्यात संधी उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील