वय लहान पण कीर्ती महान; पुण्यातील सई थोपटेनी नगरसेवक बनून रचला इतिहास

Pune Municipal Corporation Election 2026 : सई थोपटे या तरुणीने अतिशय लहान वयात पुणे महानगरपालिकेत मोठं यश मिळवित इतिहास रचला आहे.ती पुण्याची सर्वात तरुण नगरसेवक बनली आहे. भाजपने पुणे महानगरपालिका निवडणुकीत सई थोपटेला उमेदवारी दिली होती, त्यानंतर सई चर्चेत आली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात यश मिळताच सईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तिने मित्र-मैत्रिणींसोबत आनंद साजरा केला. सई थोपटे पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बीबीएसच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. सई थोपटे अत्यंत कमी वयात पुण्याची नगरसेवक बनली आहे.


भाजपच्या तिकिटावर पुण्यात नगरसेवक बनलेली सई थोपटे हिची राजकारणातील एन्ट्री रंजक होती. त्या दिवशी सई सिम्बायोसिस कॉलेजमध्ये लेक्चरला बसली होती. तेव्हाच तिला गुड न्यूज मिळाली. भाजपने सईला पुणे महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक ३६ (c) मधून उमेदवारी दिली होती. यानंतर तिने उमेदवारी अर्ज दाखल केला. सई थोपटे हिला एकूण २०,७९७ मतं मिळाली. सईचा राजकारणातील प्रवेश खूपच फिल्मी होता. तिच्या मैत्रिणींनीही तिच्या निवडणूक प्रचारात तिला पाठिंबा दिला.


ABVP शी आहे संबंध...


मिळालेल्या माहितीनुसार, सई गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेली आहे. स्वयंसेवी उपक्रम, जागरूकता मोहिम यामाध्यमातून सईने पुण्यात शिक्षण, विद्यार्थ्यांचे कल्याण, रोजगाराच्या संधी आणि युवा हक्क यासारख्या मुद्द्यांवर काम केलं आहे. पुण्यात भाजपचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) विरुद्ध झाला. भाजपने पुण्यात सत्ता कायम ठेवली. भाजपच्या विजयासह सई थोपटेने इतिहास रचला आहे. सईच्या विजयासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास चर्चेत आला आहे. तेदेखील २२ व्या वर्षी नगरसेवक आणि २७ व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले होते.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल