ठाण्याचा गड महायुतीने राखला

सलग दुसऱ्यांदा एकहाती वर्चस्व; सत्ता एकनाथ शिंदेंचीच


ठाणे :ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेला ‘शंभर पार’चा नारा यशस्वी ठरला असून, एकूण १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या यशातही स्पष्टपणे वर्चस्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच राहिले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने ७० हून अधिक जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे ठाण्याचे ‘ठाणेदार’ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी १ हजार १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी शिवसेना (शिंदे गट) चे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले.


महायुतीत शिवसेना (शिंदे गट) ने ८७ जागा, भाजपने ४० जागा तर मित्रपक्षांना ४ जागा देण्यात आल्या होत्या. निकालानुसार शिवसेनेचे ७० हून अधिक उमेदवार विजयी झाले असून, भाजपचे २७ ते २८ नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी बहुमताचा ६७ चा आकडा शिंदे गटाने सहज पार केल्याने पालिकेतील सत्ता पूर्णतः त्यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे महापौरपदही शिवसेना (शिंदे गट) कडेच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


निकराची लढत; शिंदेंचे पॅनल विजयी:


मानपाडा–आझादनगर येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेना (शिंदे गट) च्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह विक्रांत वायचळ, लहू पाटील आणि पदमा भगत हे चारही उमेदवार विजयी झाले. उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक भुषण भोईर आणि मधुकर पावशे यांनी जोरदार आव्हान दिले होते. मतदानानंतर दोन्ही समर्थकांमध्ये वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे आणि उबाठा गटाचे उमेदवारही रिंगणात असल्याने ही लढत अधिक चुरशीची ठरली. अखेर शिंदे गटाच्या पॅनलने येथे बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. ठाणे महापालिकेच्या या निकालामुळे सलग दुसऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे शहरावरचे राजकीय नियंत्रण अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


मनसे-काँग्रेस शून्य; दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष हरले:


काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का बसला असून, दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांचाही पराभव झाला. या दोन्ही पक्षांचे अक्षरशः धूळधाण झाली आहे. शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वर्चस्व कायम राखले आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी उबाठा, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याकडून महाविकास आघाडीची रणनिती आखण्यात आली होती. मनसेने महाविकास आघाडीतून २८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही मनसेला ठाण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

उल्हासनगरच्या प्रभाग ६, ७ मध्ये कलानींचा वरचष्मा

सात जागा जिंकण्यात कलानींना यश उल्हासनगर : उल्हासनगरच्या पालिकेत आपला अस्तित्व अबाधित ठेवण्यात कलानी

प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादीचा क्लीन स्वीप

नजीब मुल्ला, सुहास देसाईंसह चारही उमेदवार विजयी ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला. प्रभाग

मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

१८ दिग्गज माजी नगरसेवकाचा पराजय भाईंदर : भारतीय जनता पक्षाने सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीची

मीरा-भाईंदर प्रभाग ३ मध्ये ॲड. तरुण शर्माची बाजी

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत अवघ्या १५ मतांच्या फरकाने विजय मिळवून भाजपच्या उच्च शिक्षित

भिवंडी महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ३० जागांवर विजय मिळवत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला

कल्याण–डोंबिवलीत महापौरपदावर प्रश्नचिन्ह

शिवसेनेची अनपेक्षित मुसंडी कल्याण : कडोंमपा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, महापौरपद भाजपच्या हातातून