भाईंदर : मीरा भाईंदर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सतत तीन टर्म नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राजू भोईर प्रभाग क्र. १६ या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. राजकीय वारसा लाभलेले राजू भोईर यांचे आजोबा आणि वडील सरपंच होते. तर त्यांची आई नगरसेविका तसेच सभापती होत्या. त्यांचा वारसा चालवत राजू भोईर यांच्या सह त्यांची पत्नी भावना भोईर दोन टर्म नगरसेविका तर भाऊ कमलेश भोईर हे सुद्धा दोन टर्म नगरसेवक होते. या निवडणुकीत मात्र राजू भोईर, त्यांची पत्नी भावना भोईर आणि भाऊ कमलेश भोईर सर्व भोईर कुटुंब पराभूत झाले आहेत. राजू भोईर यांचा भाजपचे तरुण उमेदवार व पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेले नवीन सिंह यांनी पराभूत केले तर त्यांच्या पत्नीला भाजपच्या प्रतिभा जाट यांनी पराभूत केले, तर बंधू कमलेश भोईर यांना भाजपच्या मोहन म्हात्रे यांनी धूळ चारली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांना भाजपच्या संजय पवार यांनी पराभूत केले आहे.