कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मध्ये उबाठा गटाचे उमेश बोरगावकर, संकेश भोईर, स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये कडोंमपाच्या माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेविका नीलिमा पाटील, कस्तुरी देसाई यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा विजय असून शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष भोईर यांच्या पत्नी अपर्णा भोईर यांनी कडोंमपाच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव केल्याने त्या जायंट किलर ठरल्या आहेत.