मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली आहे. मुंबईत गेल्या अनेक दशकांपासून असलेली ठाकरेंची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत, तर नागपूर या उपराजधानीच्या शहरात भाजपने एकहाती वर्चस्व राखले आहे. या विजयानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त करत, "हे मत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वासाचे आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत 'मॅजिक फिगर'च्या दिशेने महायुतीची झेप मुंबई महापालिकेच्या २२७ जागांच्या निकालात भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा गाठला आहे. ताज्या कलानुसार:
भाजप : ९० जागा (आघाडी)
शिवसेना (शिंदे गट) : २८ जागा (आघाडी)
शिवसेना (ठाकरे गट) : ५७ जागा (आघाडी)
काँग्रेस : १५ जागा
मनसे : ०९ जागा भाजप आणि शिंदे गटाची आघाडी पाहता मुंबई महानगरपालिका आता ठाकरेंच्या हातून निसटून महायुतीच्या ताब्यात जाण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपने काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. नागपूरच्या विकासासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामावर नागपूरकरांनी मोहोर उमटवली आहे.
मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट) निर्णायक आघाडी घेतल्यानंतर राजकीय ...
भाजप : १०१ जागांवर आघाडी (विजयाचा मार्ग मोकळा)
काँग्रेस : ३८ जागा
इतर : १० जागा या आकडेवारीमुळे नागपूर हा भाजपचा अभेद्य किल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना सांगितले की, "महाराष्ट्रात ५१ टक्के मतांसह महायुतीचे दोन तृतियांश नगरसेवक विजयी होतील. ग्रामीण भागापाठोपाठ शहरी जनतेनेही विकासालाच कौल दिला आहे. नागपूर हे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनले असून लोकांनी 'विकसित नागपूर'साठी मतदान केले आहे." सायंकाळी ५ वाजेपर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, मात्र सद्यस्थितीत महायुती विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज आहे.