अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी व्हायला हवा. मुलांना मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा उत्तम संधी आहे. आजच्या युगातील मुलांचे भ्रमणध्वनी नव्हे तर मैदानी खेळांकडे लक्ष वळविण्यासाठी महापौर चषक क्रीडा स्पर्धा नक्कीच हातभार लावणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सन २०२६-२७ च्या महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले. महापौर चषक क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ मध्ये सहभागी होणाऱ्या विविध संघांना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहितीही महापौर तावडे यांनी दिली. त्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षांनी ही स्पर्धा आता होणार आहे.


महापौर चषक क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ च्या आयोजनाबाबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृहात संयुक्त सभेचे बुधवारी १८ मार्च, २०२६ रोजी आयोजन केले होते. यावेळी उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, समाजवादी पक्षाच्या गटनेता अमरीन शहजाद अब्राहनी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरसेवक धर्मेश गिरी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किर्तीवर्धन किरतकुडवे आदींसह मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


महापौर रितू तावडे म्हणाल्या, कोविड संसर्ग काळानंतर प्रथमच महापौर चषक क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असल्यामुळे सर्व क्रीडा संघटनांचे स्वागत आणि अभिनंदन करते. मी स्वत: राज्यस्तरीय खो-खो खेळाडू आहे. त्यामुळे खेळांविषयी मला खूप आत्मियता आहे. विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडलेल्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. यासोबतच नवीन संघटनांनाही या स्पर्धांमध्ये वाव दिला जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना महानगरपालिकेचे क्रीडांगण सहजासहजी व कमी शुल्कात उपलब्ध करुन देण्याबाबतही विचार केला जाईल, अशा शब्दात त्यांनी उपस्थित संघटनांना आश्वस्त केले.


तसेच स्पर्धेसाठी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा, या क्रीडा संघटनांच्या मागणीचा विचार करता तीनऐवजी चार महिन्यांचा कालावधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मैदानांबाबत काही अडचणी असतील तर त्याही सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. काही मैदानांवर शुल्क आकारले जात असेल तर त्या शुल्कातही सवलत देण्यात येईल. यासोबतच महापौर चषक क्रीडा स्पर्थेत स्थानिक नगरसेवकांनाही सामावून घेतल्यास स्पर्धा अधिक व्यापक प्रमाणात घेता येईल, असेही त्या म्हणाल्या. शैक्षणिक संस्थांची मैदाने स्पर्धेसाठी देण्यात यावीत, या मागणीचाही सकारात्मक पद्धतीने विचार करू, असे आश्वासनही महापौर श्रीमती तावडे यांनी दिले.


उपमहापौर संजय घाडी म्हणाले, क्रीडा संघटनांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. यासोबतच स्पर्धेच्या युगात पारंपरिक खेळ मागे पडले आहेत. त्यामुळे महापौर चषकाच्या माध्यमातून अशा खेळांना, खेळाडूंना प्रात्साहन द्यायला हवे.


बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव म्हणाल्या, सन १९७६ पासून महापौर चषक क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या चषकामुळे मुंबईतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. त्यांच्यातील खिलाडूवृत्ती जोपासली जाते. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही यथोचित मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची

Pranit More - Sejal Pawar Controversy : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी MBBS ची विद्यार्थिनी सेजल पवार सक्तीच्या रजेवर, चौकशी सुरू - माहिती

मुंबई : स्टॅन्ड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमाचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे

Ashish Shelar : आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना मुंबई, पावसाळ्यात पूर परिस्थितीचे

Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर