BMC Election 2026 : मुंबईचा बॅास कोण ? बीएमसी निवडणूक निर्णायक टप्प्यात

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत असलं, तरी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) सत्ता कोणाची येणार, याचीच सर्वाधिक चर्चा सुरु झाली आहे. तब्बल ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक बजेट असलेल्या बीएमसीसाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असतानाच, दक्षिण मुंबई आणि उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

भाजप-शिंदे युती पहिल्यांदाच मैदानात

भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्यांदाच बीएमसी निवडणूक युतीत लढवली आहे. युतीने मनपावर भगवा फडकवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे.

७५ हजार कोटींची बीएमसी – देशातील सर्वात श्रीमंत महापालिका

सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या बीएमसीचं वार्षिक बजेट ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जे अनेक राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठं आहे. बीएमसीकडे तलाव, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, उद्याने आणि पायाभूत सुविधांची मोठी संपत्ती आहे. याशिवाय सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या एफडी बीएमसीकडे आहेत.

मुंबईत २२७ वॉर्ड, बहुमतासाठी ११४ ची आवश्यकता

मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ वॉर्ड आहेत. महापौर पद मिळवण्यासाठी किमान ११४ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक जागा महत्त्वाची ठरत आहे. काही वॉर्डमध्ये १२५ कोटी रुपयांपर्यंत संपत्ती असलेले उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

बीएमसीचा निधी कुठून येतो?

बीएमसीच्या उत्पन्नाचा मोठा भाग रिअल इस्टेट प्रकल्पांवरील प्रीमियममधून मिळतो. याशिवाय मालमत्ता कर, बाजारपेठांवरील कर, फ्लॅट्स, मॉल्स आणि जीएसटीमधून बीएमसीला दरवर्षी अब्जावधींचा महसूल मिळतो. त्यामुळे रस्ते, पूल, किनारी रस्ता, सांडपाणी प्रकल्प, गृहनिर्माण योजना यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी सहज उपलब्ध होतो.
Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री