बेरोजगारी लादू इच्छिणाऱ्या ठाकरे बंधूंना घरी बसवा

भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांचा घणाघात


मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार निर्मितीच्या विरोधात आहेत, अशी टीका भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केली. बुलेट ट्रेनला दोघांचाही विरोध म्हणजे ९० हजार रोजगारांना विरोध आहे. नाणार प्रकल्पाला विरोध म्हणजे जवळपास दीड लाख रोजगाराला विरोध असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली होती. या प्रकल्पाला दोन्ही ठाकरेंचा विरोध होता. वाढवण बंदराला दोघांचाही विरोध असल्याचे शेलार म्हणाले.


बेरोजगारी लादू इच्छितात त्या ठाकरेंना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याची टीका शेलारांनी केली. इथे गुंतवणूक आली तर त्याला पिटा.


उद्योजक विरोधी, युवक विरोधी आणि कामगार विरोधी यांची भूमिका असल्याचे शेलार म्हणाले. पुरावा आम्हाला नका देऊ, संबंधित आयोगाला तर द्या. अयोग्य अनाठायी असं काही असेल तर तक्रार करा ना. नेपथ्यात एक्सपर्ट आहातच, सादरीकरण पण चांगलं करा ना. आम्ही अदानी कंपनीची वकिली करत नाही असे शेलार म्हणाले. आयसीआयसीआय बॅंकेचा नफा एक हजार कोटींनी वाढला मग काय सरकारचा हात आहे म्हणायचं का? मूळात सल्लागार कशी वाट लावू शकतात हे दिसते, असे शेलार म्हणाले.


राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावे


राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावे, असे मंत्री शेलार म्हणाले. त्या आधारे बोलले की कशी अडचण निर्माण होते. आता त्यांना स्पष्टीकरण द्यायला लागत आहे की, मी अदानी समूहाचा वकील नाही. शरद पवार यांनी अदानींना हात दिला त्यांना का नाही प्रश्न विचारत? असा सवाल शेलारांनी केला. मात्र आमच्यावर दोषारोपण करणार असाल तर मला उत्तर द्यावे लागेल, असे शेलार म्हणाले. ३७ वर्षांपासून अदानी काम करत आहेत. मग १० वर्षं आणली कुठून? असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना केला. वेठीस धरू नये, मुद्दा बरोबर पण जागा चुकीची आहे. देशात स्पर्धा आयोग आहे, त्यांचे कामच हे आहे की व्यावसायिक मोनोपॉली होऊ नये म्हणून तक्रार करता येते, त्यांनी तक्रार केली आहे का? न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावर जामीन मिळतो असे शेलार म्हणाले. एखादा प्रकल्प प्रोजेक्ट प्रकल्प कायदेशीर प्रक्रियेत जपून होत असेल किंवा नसेल तर आयोगात तक्रार करा ना असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि

हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते!

ठाकरे गटाला विसर पडलाय; रवींद्र चव्हाणांची टीका मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या