हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते!

ठाकरे गटाला विसर पडलाय; रवींद्र चव्हाणांची टीका


मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप काँग्रेसचेच आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेवेळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


रवींद्र चव्हाण म्हणाले की, १६ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या आंदोलनावर गोळीबार करणारे सरकार हे राज्यातही व केंद्रातही काँग्रेसचेच होते, हा सोयीस्कर विसर ठाकरेंना पडतो, असा आरोप त्यांनी केला.


या घटनांतूनच प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ शिवसेनेची स्थापना केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र आज ठाकरे गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मराठीचा कैवार घेत आहे, ही मोठी विसंगती असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले.


कोकण रेल्वे आणि विकासाचा मुद्दा


१९९० च्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली ती काँग्रेसमुळे नव्हे, तर मधू दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे. २०१४ नंतर मात्र भाजप सरकारच्या काळात कोकण रेल्वेवरील स्थानके सुसज्ज झाली आणि परिसराचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीच केले नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

Comments
Add Comment

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि

बेरोजगारी लादू इच्छिणाऱ्या ठाकरे बंधूंना घरी बसवा

भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलारांचा घणाघात मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू गुंतवणूक विरोधी आहेत. रोजगार

प्रचार थांबला, चुहा मिटिंग जोरात

मतदारसंघाची विजयाच्या समीकरणाची पायाभरणी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार अखेर मंगळवारी