भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील महापालिकेचा प्रभाग क्र.१८ हा विकासात आदर्श ठरला असताना यावेळेस भाजपने उमेदवारी दिलेल्या चौघांचाही विचार केला असता या पुढील काळातसुद्धा आदर्श प्रभाग ठरेल यामुळे प्रभागातील नागरिकांनी शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मीरा-भाईंदर महापालिकेचे ६ प्रभाग असून यात निवडणुकीच्या २३ प्रभागाची विभागणी करण्यात आली. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी विकासाची अनेक कामे केली. स्वच्छता स्पर्धेत देशातून महापालिका पहिल्या क्रमांकावर विजयी झाली. त्या सर्व्हेक्षणात प्रभाग १८ चे योगदान अधिक झाल्याचे गुण पत्रिकेत आहे. त्यामुळे भाजपने दिलेल्या चार उमेदवारात मागील वेळेस यशस्वीरीत्या काम केलेल्या निला सोन्स यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे आणि २ युवा उमेदवारांना भाजपने संधी दिली. भाजपने १३ युवा सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली. त्यात प्रभाग क्रमांक १८ मधील २ उमेदवारांचा समावेश आहे. नीला सोन्स अनेक वर्षांपासून या प्रभागात काम करत असल्याने त्यांचा अनुभव दोन युवा उमेदवारांना होणार आहे. तसेच त्यांचा वाढता जनाधार पाहता भाजपचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.