लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव 


मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.


“लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहिण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते.


“राज्य निवडणूक आयोगाने ४  नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे,” असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळविले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु अग्रिम स्वरुपात लाभ देता येणार नाही; तसेच नवीन लाभार्थीदेखील निवडता यणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Comments
Add Comment

‘येतो मुंबईत, हिंमत असेल तर पाय कापा’!

के. अण्णामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान मुंबई : ‘रसमलाई’ आणि ‘पाय कापणे’सारख्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण १० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणी मुंबई (विशेष

दुबार मतदारांपैंकी ४८ हजार मतदारांचा मतदानाचा मार्ग मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या बनवताना दुबार मतदारांचा शोध घेण्यात येत

एका वेळी दोन प्रभागांचीच होणार मतमोजणी

मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी एका वेळी दोनच

निवडणूक काळात तब्बल ३ कोटी १० लाखांची रोख रक्कम जप्त

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित आचारसंहितेच्या काळात तब्बल ३ कोटी १० लाख १७ हजार २०

मराठी माध्यमच्या पोरांनी गाजवले थिएटर्स’! क्रांतीज्योती विद्यालय ११ दिवसांत १० कोटींच्या पार

मुंबई : मराठी सिनेविश्वासाठी नववर्षाची सुरुवात जल्लोषाची ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती