मोहित सोमण: एकीकडे भूराजकीय अस्थिरता कायम आहे त्यात चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आता युएसमधील डिसेंबर महिन्यातील नॉन पेरोल रोजगार आकडेवारी समोर आली आहे. आलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात युएस मध्ये अपेक्षेपेक्षा कमी ५०००० रोजगार निर्मिती झाली असली तरी महागाईची आकडेवारी अपेक्षेपेक्षाही ४.४% पातळीवर घसरल्याने पुन्हा एकदा बाजारात दरकपातीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आश्वासकता निर्माण झाल्याने पुन्हा एकदा सोने व चांदी यांच्या दरात सलग दुसऱ्यांदा तुफान वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात सोने प्रति तोळा २३६० रूपयांंनी वाढली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११५ रुपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ८६ रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४०४५ रुपये, २२ कॅरेटसाठी १२८७५ रुपये, १८ कॅरेटसाठी १०५३४ रूपयांवर पोहोचले आहेत. आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११५०, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १०५०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८६० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४०४६०, २२ कॅरेटसाठी १२८७५०, १८ कॅरेटसाठी ८६० रुपयांवर पोहोचली आहे.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४०४६,२२ कॅरेटसाठी १२८७५, १८ कॅरेटसाठी १०५३४ रूपयांवर पोहोचले आहेत. तसेच भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मधील चांदीच्या दरात दुपारपर्यंत ०.०४% किरकोळ वाढ झाली असून दरपातळी १३८८७५ रूपयावर पोहोचले आहेत. एमसीएक्सवरील फेब्रुवारी महिन्याच्या सोन्याच्या वायदा करारांमध्ये प्रति १० ग्रॅम ११६० रुपयांची वाढ होऊन दरपातळी १३८९०२ रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत ०.९०% वाढ झाली असून दरपातळी ४५०० औंस प्रति डॉलरवर गेली आहे. युएस बाजारातील गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत ०.४५% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ४५१०.४५ औंसवर गेली आहे.
आणखी सोने का वाढतेय?
एकीकडे युएस बाजारातील रोजगार आकडेवारी आश्वासक आली असताना युएसने व्हेनेझुएलावर ताबा घेतल्यावर आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वाढत्या तणावाच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीत वाढ करून हेजिंग केल्याने मोठ्या प्रमाणात सोन्यात आज मागणी वाढली. गोल्ड ईटीएफसह सोन्याच्या भौतिक गुंतवणूकीत वाढ झाल्याने पुरवठा मर्यादित झाला होता. दुसरीकडे ट्रम्प यांनी लादलेल्या ५० देशावरील टॅरिफवर आज युएस फेडरल न्यायालय निकाल देणार असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे लक्ष या घडामोडीकडे आहे. एकीकडे ही वाढ होत असताना दुसरीकडे आणखी सोन्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आज सलग दुसऱ्यांदा सोन्यात वाढ झाली. गेल्या १० दिवसात सोने भारतीय सराफा बाजारात प्रति ग्रॅम सोने ५१० रूपयांनी वाढले असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. म्हणजेच संपूर्ण केवळ जानेवारी महिन्यात ४% पेक्षा अधिक वाढ सोन्यात झालेली आहे. आज मात्र डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने आणखी दबाव कमोडिटीत वाढला होता. भारतीय बाजारात तर विशेषतः दुपारी रूपया २६ पैशाने कोसळल्याने सोन्यात आणखी दबाव पातळी निर्माण झाली होती.