वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार


नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, तर दुसरा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे. पहिल्या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणांवर फारसा परिणाम होणार नाही; मात्र भारत-वेस्ट इंडिज हा सामना एका अर्थाने ‘क्वार्टर फायनल’ ठरणार आहे.


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार असल्याने या सामन्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पण एका गोष्टीमुळे क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवली आहे. ती गोष्ट म्हणजे पाऊस. जर हा सामना पावसामुळे सामना रद्द झाला, तर त्याचा थेट फटका भारतीय संघाला बसणार आहे.


भारत वेस्टइंडीज सामना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. सुपर ८ फेरीत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे गुणतालिकेत दोघांचेही प्रत्येकी दोन गुण आहेत. हा सामना जिंकणारा संघ चार गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघाला प्रत्येकी १ गुण मिळेल. अशावेळी दोन्ही संघाचे तीन गुण होतील. त्यानंतर रनरेटनुसार एक संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.



पावसाच्या सावटामुळे भारताच्या वाढणार अडचणी


रन रेटबाबत बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिज संघाचा नेट रनरेट भारतापेक्षा जास्त आहे. दोन सामन्यांनंतर भारताचा नेट रनरेट -०.१०० आहे, तर वेस्ट इंडिजचा +१.७९१ आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीचे तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. बीबीसी वेदर आणि अॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता तशी कमी आहे. त्यामुळे सामना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अनपेक्षितरीत्या पाऊस झाला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढणार आहेत.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला