CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात दोन परदेशी (नायजेरियन) तरुणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एमजीएम हॉस्पिटल रोडवर संबंधित तरुणांनी एका महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. तसेच महिलेला मारहाण केल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना परिसरात समजताच स्थानिक नागरिक संतप्त झाले आणि मोठी गर्दी जमा झाली.


 


 

संतप्त जमावाने दोन्ही तरुणांना पकडून भररस्त्यात मारहाण केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला जमावाला शांत करणे आव्हानात्मक ठरले; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित तरुणांना जमावाच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले.


सध्या दोन्ही तरुणांची चौकशी सुरू असून, महिलेच्या तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र