पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील टाकवहाल परिसरातील बंद पडलेल्या दगड खाणीत ही दुर्घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमकं काय घडलं ?


मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ असलेल्या खाणीत शुक्रवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी उतरली होती. मात्र पाणी किती खोल असेल याचा अंदाज न आल्याने दोन्हीही मुलांचा बुडून मृत्युज आला आहे. या घटनेत जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह सापडला आहे. तर आयुष मुकेश पवार (वय १५) याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. यांचे कुटुंब हे मूळचे इंदोरचे असून रोजगारासाठी पालघरमध्ये मनोर परिसरात कामानिमित्त वास्तव्यास होते.



पोलिसांची शोधमोहीम


घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई -विरार महापालिका अग्निशमन दलाकडून शोधकार्य राबविण्यात आले. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बंद खाणींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंद पडलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यामुळे धोका वाढत असल्याची चर्चा आहे. अशा ठिकाणी सुरक्षाव्यवस्था आणि इशारे फलक नसल्याने अपघातांची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे