अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती


अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात आज सर्वांत मोठी रणनिती उघडकीस आली आहे. राज्यात महायुती असली तरी ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली. या खेळीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे विजयी झाल्या. निवडणुकीत भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक मिळून ३२ सदस्यांची मोट तयार झाली असून, भाजप बहुमत मिळवणार आहे.


अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ला मानली जात होती. अनेक वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) भाजपच्या युतीने मोठा झटका दिला आहे. तेजश्री करंजुळे यांच्या यशामुळे शिवसेनेची (शिंदे गट) प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या युतीने अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषद राजकारणासाठी ही महत्त्वाची वळणबिंदू ठरणार आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे-पाटील यांनी असा दावा केला की, ''युतीसाठी शिवसेनेकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. निवडणुकीत अंबरनाथ नगर परिषदेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. ही नगर परिषद कल्याण लोकसभा मतदारसंघात येते, त्यामुळे भाजप-काँग्रेसची युती शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.'' या युतीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषदेतील सत्ता विभाजनासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड

धारण तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका सतर्क

तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती

ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी