मोहित सोमण: एलआयसी (Life Insurance Corporation of India LIC) गुंतवणूकदारांसाठी धमाकेदार विमा योजना घेऊन आली आहे. 'एलआयसी जीवन उत्सव ' (LIC Jeevan Utsav' असे या योजनेचे नाव आहे. कंपनीने याबद्दलची माहिती आज एक्सचेंजला दिली असून १२ जानेवारी २०२६ पासून ही विमा योजना विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याविषयी माहिती देताना एलआयसीने म्हटल्याप्रमाणे, ही योजना नॉन-पार (Non Par), नॉन लिंक (Non Linked), वैयक्तिकृत बचत (Individual Savings), संपूर्ण आयुष्य विमा योजना (Whole Life Insurance Plan) असल्याचे एलआयसीने म्हटले आहे. ही योजना केवळ संपूर्ण भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे असे कंपनीने म्हटले.
ही योजना संपूर्ण आयुष्यभरासाठी विमा कव्हरेज देणार असून ग्राहकांना परतावा कमावण्यासाठीही संधी मिळणार आहे. अर्थात ही गुंतवणूक योजना नसल्याने व्याज अथवा तत्सम लाभांश व इतर इक्विटी लिंक फायदे गुंतवणूकदारांना मिळणार नाहीत. वयाच्या १०० वर्षांपर्यंत ही पॉलिसी व्यक्तीला कव्हरेज देणार असून रेग्युलर अथवा फ्लेक्सिबल परताव्याची संंधी पण देते.
विमा योजनेची वैशिष्ट्ये -
या विमा योजनेत वयाच्या १०० वर्षांपर्यंत विमा कव्हरेज मिळणार आहे.
विम्यातील प्रत्येक प्रिमियममागे गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा मिळणार आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही १००० रूपये भरलेत त्यामागे किमान ४० रूपये परतावा निश्चितपणे मिळेल
ज्या व्यक्तीच्या नावे विमा असेल ती व्यक्ती मृत झाली अथवा हयात नसेल तर संबंधित वारश्याला (Nominee) मूळ प्रिमियम रक्कम अधिक परतावाही अतिरिक्त मिळेल
ज्या दिवशी विमा खरेदी केल्या त्या पहिल्या प्रिमियमपासून ते शेवटपर्यंत भरलेल्या प्रिमियम तुलनेत मृत व्यक्तीला मूळ रक्कमपेक्षा तुलनेत १०५% परतावा मिळेल.
ही रक्कम आयकर विभागाकडून दखलपात्र असल्याने आयकर कायदा ८० सी (Income Tax Act 1961 Sub Section 80C) अंतर्गत या विमा रक्कमेवर गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ही रक्कम टॅक्स रिटर्न भरताना वजावटीसाठी (Income Tax Deductions) पात्र असेल.
कर्जासाठी पात्र - प्रथम वर्षांतील संपूर्ण कर प्रिमियम भरल्यानंतर या योजनेतून कर्जही मिळू शकते. तसेच संपूर्ण एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय दिलेला आहे.
फ्लेक्सिबल पेमेंट प्लान- या योजनेतील विमाधारकांना आपल्या सोयीनुसार ५ ते १६ वर्षाचा प्रिमियम कालावधी भरण्याची तरतूद या योजनेत असेल.
आयुष्यभर परतावा कमाई- जेव्हा पेमेंट प्लान पूर्ण होईल त्यानंतर विमाधारकांना (Policyholders) आयुष्यभर परतावा मिळू शकेल.
वर्षाच्या बेसिक रकमेच्या १०% रक्कम ही रेग्युलर परतावा योजनेत दिली जाईल अथवा फ्लेक्सिबल परताव्याची वर्षाच्या १०% बेसिक परताव्यात ५.५% व्याजासह रिटर्न मिळणे शक्य आहे. यामध्ये फ्लेक्सी उत्पन्न लाभ उपलब्ध असल्याने वार्षिक १०% उत्पन्न पुढे ढकलून जमा करता येते. ज्यावर प्रतिवर्ष ५.५% दराने व्याज मिळते, तसेच पैसे काढण्याचा लवचिक पर्यायही या योजनेत उपलब्ध आहे.
जीवन उत्सव योजनेत (योजना ७७१) एकच, एकवेळ (One Time) प्रीमियम भरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. ज्यामुळे आजीवन संरक्षण आणि भविष्यातील उत्पन्नाच्या प्रवाहासारखेच मुख्य फायदे मिळतात. ही योजना अशा व्यक्तींसाठी तयार केली आहे ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी एकरकमी रक्कम उपलब्ध असेल.
पॉलिसी वर्षाच्या सुरुवातीला किमान वय १८ असेल ज्यामध्ये पहिल्या नियमित उत्पन्न लाभ/फ्लेक्सी उत्पन्न लाभ पर्यायानुसार उपलब्ध होईल. हप्त्याच्या भरण्याची (Loan Repayment) पद्धत किमान हप्त्याची रक्कम मासिक ५०००/, त्रैमासिक १५०००/, सहामाही २५०००/,वार्षिक ५००००/असेल.
१ मे ते ३० एप्रिल या १२ या आर्थिक वर्षात सुरू होणाऱ्या सर्व हप्त्यांच्या पेमेंट पर्यायांसाठी, प्रत्येक हप्त्याची रक्कम निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा व्याजदर हा १० वर्षांच्या सहामाही (जी-सेक) दरापेक्षा २% कमी नसलेला वार्षिक प्रभावी दर असेल जिथे, १० वर्षांचा सहामाही (जी-सेक) दर हा मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसाचा असेल.
त्यानुसार, १ मे २०२४ ते ३० एप्रिल, २०२५ या १२ महिन्यांच्या कालावधीसाठी, हप्त्याच्या रकमेसाठी लागू होणारा व्याजदर वार्षिक ५.०७% प्रभावी असेल.
मृत्यू लाभ हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्याय वापरण्यासाठी पॉलिसीधारक किंवा विमाधारकाच्या अल्पवयीन काळात किंवा जर विमाधारक सज्ञान असेल तर पॉलिसी चालू असताना त्याच्या/तिच्या हयातीत हा पर्याय वापरू शकतात ज्यासाठी निव्वळ दाव्याची रक्कम नमूद करावी लागेल.
त्यानंतर मृत्यू दाव्याची रक्कम पॉलिसीधारक/विमाधारकाने निवडलेल्या पर्यायानुसार नॉमिनीला दिली जाईल आणि नॉमिनीला कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मोठ्या मूलभूत विमा रकमेसाठी प्रिमियम दरात सवलतीच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाते, जे मूलभूत विमा रकमेच्या तीन गटांसाठी आहे: i) १०००००० ते २४००००० ii) २५००००० ते ४९००००० iii) ५०००००० आणि त्याहून अधिक रक्कम
वाढीव मूलभूत विमा रकमेसाठीची सवलत मूलभूत विमा रकमेच्या गट आणि प्रीमियम भरण्याच्या मुदतीवर अवलंबून असते. मूलभूत विमा रक्कम कमी गटातून उच्च गटात (High Premium) गेल्यास सवलत वाढते आणि प्रीमियम भरण्याच्या मुदतीत वाढ झाल्यास ती कमी होते. कोणत्याही एजंट/मध्यस्थाच्या मदतीशिवाय ऑनलाइन विक्री अंतर्गत पूर्ण होणाऱ्या प्रस्तावांना प्रीमियमवर १०% सूट मिळेल.
जर विमाधारकांना कर्ज हवे असेल तर मंजूर करता येणारे कमाल कर्ज खालीलप्रमाणे असेल:
(i) जर कर्ज पॉलिसी वर्षाच्या सुरुवातीपूर्वी घेतले गेले, ज्यामध्ये पहिला नियमित उत्पन्न लाभ (Regular Income Benefit/ फ्लेक्सी उत्पन्न (Flexible Income Option) लाभ लागू होणार
दोन्ही पर्यायांतर्गत मूल्याच्या टक्केवारीनुसार कमाल कर्ज खालीलप्रमाणे असेल: चालू पॉलिसींसाठी - ७५% पर्यंत, पेडअप पॉलिसींसाठी - ५०% पर्यंत
हा विमा प्लॅन कुठे खरेदी करू शकाल?
हा प्लॅन परवानाधारक एलआयसी एजंट,कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर्स, विमा मार्केटिंग फर्म्स तसेच www.licindia.in वेबसाइटद्वारे थेट ऑनलाइन खरेदी करता येतो. हा पॉइंट ऑफ सेल्स पर्सन-लाइफ इन्शुरन्स (POSP-LI) / कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटर्स (CPSCSPV) द्वारे विक्रीसाठी उपलब्ध नाही.
एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाची' स्थापना १ सप्टेंबर, १९५६ रोजी जीवन विमा महामंडळ कायदा, १९५६ अंतर्गत जीवन विम्याचा अधिक व्यापक प्रसार करण्यासाठी झाली होती.विशेषतः ग्रामीण भागांमध्ये, देशातील सर्व विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांना विमा उतरवलेल्या घटनांविरुद्ध पुरेसे आर्थिक संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. भारतीय विमा क्षेत्राच्या उदारीकरणानंतरच्या परिस्थितीतही एलआयसी एक महत्त्वाची जीवन विमा कंपनी राहिली आहे आणि ती स्वतःचे पूर्वीचे विक्रम मोडीत काढून एका नवीन विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. आपल्या सहा दशकांहून अधिक अस्तित्वात, एलआयसीने कामकाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती केली आहे. सध्या एलआयसीचा विमा बाजारातील मार्केट शेअर्स ६५.८३% आहे. तर एक वर्षांचा प्रिमियम कलेक्शन २२६६६९ कोटींवर गेले आहे.